लतादीदींचं आपल्याला काही समजतच नाही. सर्व धर्मांतल्या लोकांना त्यांचं ‘अपील’ आहे, पण त्यांची उठबस आहे...
समजा, पुढे काही कारणांनी जर भारताच्या भौगोलिक सीमा पुसल्या गेल्या, तर एक साधा सांस्कृतिक निकष लावून त्या परत मिळवता येतील. ‘जिथपर्यंत लतादीदींचं गाणं पोहोचलेलं आहे, जिथल्या माणसांना लता मंगेशकर हे नाव ठाऊक आहे; तो भूभाग भारताचा’- असं ठरवायचं. या निकषामुळे हिंदुत्ववाद्यांचं अखंड भारताचं स्वप्नही जाता-जाता पूर्ण होऊ शकेल. कारण हा निकष लावला तर पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान यांचा समावेशही भारतात करावा लागेल.......